भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
542

रावेत , दि. ०३ (पीसीबी) -भरधाव वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास औंध रावेत बीआरटी रोडवर रावेत येथे घडला.

आशुतोष शंकर लोकरे (वय 27) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार शशिकांत भिंगावडे (वय 34, रा. तळवडे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेहुणा आशुतोष लोकरे हे 28 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास मुकाई चौक, रावेत येथे रस्त्याने पायी चालत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या एका वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातामध्ये आशुतोष हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळी न थांबता घटनेची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.