दि . ९ ( पीसीबी ) – लखनौला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधून पाच प्रवासी खाली पडल्याची माहिती समोर येत आहे. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी खाली पडले. छत्रपती शिवाजा महाराज टर्मिनलवरून ही एक्स्प्रेस निघाली होती. या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचवण्याची व्यवस्था तातडीने केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल लीला यांनी दिली. त्याचप्रमाणे या घटनेनंतर रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे प्रवासी रेल्वे रुळावर नाही, तर रुळाच्या बाजूला पडले, असं लीला यांनी सांगितलं आहे. हे प्रवासी एक्स्प्रेसमधून नेमके कसे पडले, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही.
“पाच प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ रेल्वेतून खाली पडले. कसाऱ्याला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डनं याबाबतची माहिती दिली. नेमक्या कोणत्या गाडीतून प्रवासी खाली पडले, याबाबत अद्याप माहिती नाही. कसाऱ्याला जाणारी लोकल आणि पुष्पक एक्स्पेस बाजूनेच जात होत्या. त्यामुळे कोणत्या ट्रेनमधून हे प्रवासी खाली पडले, हे समजू शकलेलं नाही,” अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.














































