भरधाव दुचाकी चालवणे बेतले जीवावर

0
439

पिंपरी ,दि.०७(पीसीबी) – भरधाव दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. काळेवाडी फाटा येथून जात असताना तरुणाच्या दुचाकीचा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडली.

अखिलेश राजकिशोर यादव (वय 23, रा. वाकड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच 14/एचएन 3891) भरधाव चालवली. डांगे चौकातून काळेवाडी फाटा येथे जात असताना फिनिक्स हॉस्पिटल जवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.