भरधाव दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी

0
115

महाळुंगे, दि. 8 (प्रतिनिधी)

भरधाव दुचाकी चालवून दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात समोरच्या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बजाज कंपनी समोर महाळुंगे येथे घडला.

ऋषिकेश प्रदीप पवार (वय 20, रा. शिक्रापूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/एचसी 8557 क्रमांकाच्या दुचाकी स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र एकविरा देवी येथे गेले होते. तिथून परत येत असताना महाळुंगे येथे फिर्यादी पवार यांचा मित्र राहुल बिलपे चालवत असलेल्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीने समोरून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये राहुल आणि दुचाकी वरील सहप्रवासी तरुणी गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.