भरधाव कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी

0
106

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) हिंजवडी,
भरधाव कारने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. त्यामध्ये डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेदहा वाजता माण रोड, हिंजवडी येथे घडली.

सेतानराम देवाराम बिष्णोई (वय 27, रा. माण, हिंजवडी) असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वीगी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी करतात. ते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास माण येथे डिलिव्हरी देण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला समोरून भरधाव आलेल्या एका कारने जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर कार चालक पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.