भरधाव कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

0
123

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) देहूरोड,

भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दांपत्य जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री नऊ वाजताच्या सुमारास सेंट्रल चौक, देहूरोड येथे घडली.

सुरेश मुदलीयार, नागेश्वरी सुरेश मुदलीयार (वय 35, रा. साईनगर, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. नागेश्वरी यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/केडब्ल्यू 6607 या कारचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती त्यांच्या दुचाकीवरून साईनगरकडे जात होते. सेंट्रल चौक येथे आरोपी कार चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव चालवली. त्याने कारने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे पती जखमी झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.