भरधाव कारची दुचाकीला धडक

0
242

ताथवडे, दि. २१ (पीसीबी) – भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील व्यक्ती जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि. २०) दुपारी ताथवडे येथे घडली.

परमजित सिंग भाटिया (रा. पिंपरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रणवीर सिंग परमजित सिंग भाटिया (वय ४०, रा. पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील परमजित सिंग हे दुचाकीवरून (एमएच १४/जेजी ५३७१) ताथवडे चौकातून डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी अज्ञात कार चालकाने परमजित सिंग यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात परमजित सिंग यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच यात दुचाकीचेही नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.