भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

0
238

सांगवी, दि. १ (पीसीबी) – भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना ८ जानेवारी रोजी सकाळी सव्वादहा वाजता विश्वशांती कॉलनी, पिके चौक पिंपळे सौदागर येथे घडली.

राजेंद्र लक्ष्मण शिंगटे (वय ४२, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ३०) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच १७/एजे ४१०३ क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कार भरधाव वेगात चालवली. फिर्यादी यांच्या पत्नी (वय ३८) दुचाकीवरून जात असताना आरोपीने फिर्यादींच्या पत्नीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर फिर्यादींच्या पत्नीला गाडीसह फरफटत नेऊन जखमी केले. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.