भरधाव कारची टेम्पोला धडक; कार चालकाचा मृत्यू

0
64

चाकण, दि. २१ (पीसीबी)

भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका टेम्पोला समोरून धडक दिली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला. तर टेम्पो मधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात चाकण शिक्रापूर मार्गावर बुधवारी (दि. 20) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडला.

विशाल रामदास येमनर (वय 34, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तर सलीम मुबारक शेख (वय 39, रा. छत्रपती संभाजीनगर), रिजवान सलीम शेख (वय 19, रा. छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावे आहेत. सलीम शेख यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याच्या कारने शिक्रापूर चाकण रोडने वेगात जात होता. त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या शेख यांच्या टेम्पोला जोरात धडक दिली. या अपघातात विशाल याचा मृत्यू झाला. तर सलीम शेख आणि त्यांचा मुलगा हे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.