भरदिवासा तरुणावर वार करत टोळक्याची हवेत कोयते फिरवत दहशत

0
274

थेरगाव, दि. ३० (पीसीबी) – थेरगाव येथे तरुणावर कोयत्याने वार करत टोळक्याने हवेत कोयता फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 29) दुपारी थेरगाव येथील बारणे चाळ येथे घडली.

याप्रकरणी आनंद सुभाष जेवूरकर (वय 29 रा.थेरगाव) यानी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी अखिल उर्फ आदेश सुधीर बाबर व त्याचे इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामावरून येवून त्यांच्या मित्रांसोबत चाळीजवळ गप्पा मारत थांबले असताना आरोपी हे दुचाकीवरून आले. त्यातील अखिल हा आरोपीच्या ओलखीचा आहे. त्याने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी माराहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या कंबरेचा कोयता काढून आरोपीवर वार केले. यात आरोपींगभीर जखमी झाले. यावेळी आरोपींनी हातातील कोयात फिरवत कोणी मध्ये आले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. यावरून वरुन वाड पोलिसांनी आरोपीवर खूनाचा प्रयत्न व बेकाया शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.