भरदिवसा तासाभरात तीन लाखांची घरफोडी

0
186

दि. २३ जुलै (पीसीबी) चाकण,
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख 11 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी दीड ते अडीच वाजताच्‍या दरम्‍यान चाकण येथे घडली.

अमर रमेश कदम (वय 30, रा. आनंद रेसीडेन्सी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 22) याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड ते अडीच वाजताच्‍या दरम्‍यान फिर्यादी अमर यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्‍यावेळी चोरट्याने त्‍यांच्‍या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 81.78 ग्रॅम वजनाचे तीन लाख 11 हजार रुपये किंमतीचे सोन्‍याचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक तलावडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.