भन्नाट जुगाड…एक्स्प्रेस वे च्या वाटेत घर आल्याने “त्यानं” संपूर्ण घरच जागचं हलवलं…

0
296

पंजाब,दि.२१(पीसीबी) – पंजाबमधील संगरूरमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या वाटेत एका शेतकऱ्याचे घर आले. शेतकऱ्याला त्या घरासाठी नुकसानभरपाईही देऊ केली होती, पण जमीनमालकाला दुसरे घर बांधावेसे वाटले नाही, म्हणून त्याने आपले घर महामार्गापासून ५०० फूट अंतरावर हलवण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत हे घर 250 फुटांवर हलवण्यात आलं आहे.

हे दुमजली घर 500 फूट अंतरावर हलवण्याचे काम सुरू आहे. घराचे मालक सुखविंदर सिंग सुखी यांनी सांगितले की, मी हे घर शिफ्ट करत आहे कारण ते दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवेच्या मार्गावर येत होते. मला भरपाईची ऑफर देण्यात आली होती पण मला दुसरे घर बांधायचे नव्हते. ते बनवण्यासाठी मी सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. आणि आत्तापर्यंत आम्ही ते २५० फूट मागे नेलं आहे.

जॅकच्या मदतीने घर उभे केले
घराला चक्क जॅक लावून उभे केले आहे. संपूर्ण घर हलवण्याचे काम तितके सोपे नाही. त्यासाठी संथगतीने काम सुरू आहे. कोणतेही नुकसान न होता घर हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे घर संपूर्णपणे हलवण्यासाठी आणखी २ महिन्यांचा अवधी लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.