भटक्या कुत्र्यांचा प्रश्न महापालिका सभागृहातराजू मिसाळ यांचा प्रशासनावर कठोर टीका

0
2

शहरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा नगरसेवक राजू मिसाळ यांनी आज महापालिका सभागृहात उपस्थित केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. महापौर रवी लांडगे अध्यक्षस्थानी होते.

मिसाळ यांनी खेळण्यातील कुत्रा प्रशासनाला गिफ्ट दिला आणि आपल्या भाषणातून ताशेरे ओढले. ते म्हणाले, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत आता सुप्रिम कोर्टाचा निर्णय आला आहे, त्यांनी काही निर्देश दिले आहेत, प्रशासनाने त्याबाबत काय केले. शहरातील नागरिक हतबल आहेत. नागरिकांना रस्त्याने जाता येत नाही. प्राधिकरणात मुलांना शाळेत सोडायला आलेली व्हॅन कुत्र्यांच्या तावडित सापडली, कुत्र्याने झडप घातल्याने मुले जखमी झाली. अशा अनेक घटना आहे. आमदार महेश लांडगे यांना थेट विधानसभेत हा विषय मांडवाल लागला हे महापालिकेचे अपयश आहे. आता याबाबत विनंती आहे की या विषयावर खुलासा झाला पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेत त्यात आपण काय केले पाहिजे याच्या गाईडलाईन दिल्यात. आज सर्व उद्याने, शाळा, महाविद्यालये यांच्या बाहेर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आहे. प्राधिकरणात एक प्राणीप्रेमी व्यक्ती रोज या भटक्या कुत्र्यांना मटन खायला देते आणि दोन दिवस मटन मिळाले नाही तर, तीच कुत्री माणसांवर हल्ला करतात. आता यांचा बंदोबस्त करा अशी मागणी मिसाळ यांनी केली.
निर्बिजीकरण जितके होईल तितके करावे.