दि . २८ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दिवेसंदिवस अनेक मोठे खुलासे होत आहेत. सुनेच्या मृत्यूनंतर फरार असताना सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना केवळ कर्नाटकच्याच मंत्र्याच्या मुलानेच मदत केली नसून अटकेत असलेला सुयश चोंधेचा भाऊ संकेत चौधे यानेही मदत केली आहे.
वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत चोंधे असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे चोंधे कुटुंबावरही सुनांचा छळ केल्याचा आरोप आहे.
हगवणे प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधे हा संकेतचा मोठा भाऊ आहे. या दोन्ही भावांच्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघा भावांवरही त्यांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत.
महिला आयोग अडचणीत?
संकेतचा भाऊ सुयश चोंधे याच्या पत्नीने चोंधे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. नवऱ्याने फोनवरुन धमकी दिल्याप्रकरणी तिने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुयश चोंधे याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सुयशच्या पत्नीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. अशी माहिती समोर येत आहेत. तसेच, नवरा सुयश चोंधे, दीर संकेत चोंधे, सासरा नरेश चौंधे, सासू वैशाली चौंधे यांच्या विरोधात पोलिस आणि महिला आयोगामध्ये तक्रार करण्यात आली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. असा आरोप करण्यात येत आहेत.
संकेत चोंधे याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आमचे लग्न मोडावे यासाठी सासू काळी जादू करते, असे चौंधेंच्या दुसऱ्या सुनेनं म्हटलं आहे. लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला आणि दोन तोळं सोनंही दिलं. परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यातून आपल्याला मारहाण केली जाते, आपला छळ केला जातो.
तर दुसऱ्या सुनेचा धक्कादायक आरोप
नवरा सुयश चौंधे हा ब्ल्यू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा. तर नवरा आणि दीर सासूसमोरच गांजा प्यायचे असा आरोप चौधेंच्या दुसऱ्या सुनेनं केला आहे. आपल्याला आणि आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी त्या सूनेने केली आहे.
सुयश चोंधे आणि त्याचा भाऊ संकेत चोंधे या दोघांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जाण्यास मदत केली होती. त्यांनी हगवणे बाप-लेकाला पळून जायला थार ही कार दिली होती.