ब्लॅकमेलिंग,खंडणीखोरीच्या आरोपातील मंगलदास बांदल वंचितचे शिरूरमधून उमेदवार

0
177

दि 3 एप्रिल (पीसीबी )- राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीनं पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली तर शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खंडणी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षे तुरुंगात बंद असलेल्या आणि काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगलदास बांदल यांना 26 मे 2021 ला पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षे मंगलदास बांदल तुरुंगात बंद होते. त्याआधी पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्पाय कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्या सराफ व्यावसायिकाला पन्नास कोटी रुपयांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून देखील मंगलदास बांदल यांना आधी अटक करण्यात आली होती. मंगलदास बांदल यांच्यावर पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी परिसरात खंडणी आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

मंगलदास बांदल हे यांनी 2009 ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. 2019 ला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे ‘ अजित पवार ‘ शरद पवार ‘ देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला होता. शिरुरचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पक्ष प्रवेशावेळी देखील मंगलदास बांदल उपस्थित होते. त्यानंतर काहीच दिवसांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचीही त्यांनी भेट घेतली होती.त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आलीय. शिरुरमध्ये आढळराव पाटील, अमोल कोल्हे आणि मंगलदास बांदल यांच्यात तिहेरी लढत होणार आहे.

वंचितचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार
नांदेड – अविनाश बोसिरकर
परभणी- बाबासाहेब उगळे
छत्रपती संभाजीनगर – अफसर खान
पुणे – वसंत मोरे
शिरूर – मंगलदास बांदल
हिंगोली – डॉ. बी.डी. चव्हाण
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारसकर
सातारा – मारुती धोंडीराम जानकर
धुळे – अब्दुल रहमान
हातकणंगले – दादासाहेब उर्फ दादागौडा चवगोंडा पाटील
रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे
जालना – प्रभाकर देवमन बकले
मुंबई उत्तर मध्य – अबुल हसन खान
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका