ब्रेक फेल झाल्याने कारची चार ते पाच दुचाकींना धडक

0
114

रावेत, दि.२० जुलै (पिसीबी) – दुरुस्त केलेल्या कारची ट्रायल घेत असताना अचानक कारचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे कार घसरली आणि आठ ते दहा दुचाकींना धडक बसली. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 19) सायंकाळी मस्के वस्ती, रावेत येथे घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्के वस्ती येथील एका गॅरेज मध्ये दुरुस्तीसाठी कार आली. कारची दुरुस्ती केल्यानंतर गॅरेज चालक कारची ट्रायल घेत होता. मस्के वस्ती येथे ट्रायल घेत असताना कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अचानक ब्रेक लॉक झाला.

त्यामुळे कार घसरली गेली आणि कारची रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चार ते पाच दुचाकींना धडक बसली. यामध्ये दुचाकिंसह कारचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.