ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

0
335

लंडन,दि.०८(पीसीबी) – ब्रिटनमध्ये राजकीय सत्तासंघर्षात आता पंतप्रधानांना राजीनामा देण्याची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या ४८ तासात त्यांच्या ५० हून अधिक मंत्री आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. बोरिस यांच्या सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव वाढत चालल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. विशेष म्हणजे ३६ तासांपूर्वी मंत्री झालेल्या मिशेल डोनलन यांनी देखील राजीनामा दिलाय.

ब्रिटिश मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार पक्षाचे नेते म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यानंतर देखील ते काही वेळ पंतप्रधान असतील. याआधी बुधवारी बोरिस यांनी मोठा धक्का बसला होता. त्यांच्या मंत्रिमंडळातील तिघांनी राजीनामा दिला होता. बुधवार संध्याकाळपर्यंत १७ मंत्री आणि १२ संसदीय सचिवांनी तसेच विदेशात नियुक्त करण्यात आलेल्या सरकारच्या चार प्रतिनिधींनी राजीनामा दिले होते. राजीनामा दिलेल्या सर्वांनी बोरिस यांच्या कामाच्या पद्धतीवर आणि सॅक्स स्कॅडलचा मुद्दा उपस्थित केला होता.

बोरिस यांच्या विरोधात कॅबिनेटमध्येच बंड झाले होते. तरी देखील पदावर राहण्याचा त्यांचा हट्ट होता. याआधी त्यांनी पद सोडण्यास नकार दिला होता. कॅबिनेटमधील सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला होता.

नव्या पंतप्रधानपदासाठी माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि फॉरेन कॉमन वेल्थ अॅण्ड डेव्हलपमेंट अफेअर्सचे सचिव लिज ट्रस आघाडीवर आहेत. करोनाच्या काळात देण्यात आलेल्या पॅकेजमुळे ते लोकप्रिय आहेत. पंतप्रधान पदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर सुनाक आहेत. त्यांची पत्नी अक्षता मूर्ती देखील सक्रीय आहेत. अक्षता या इन्फोसिसच्या सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या आहे.