ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या समाज विघातक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करा

0
179

चिंचवड, दि. १ (पीसीबी) : आज ब्राह्मण समाजाविरुद्ध गरळ ओकणाऱ्या योगेश सावंत यावर कायदेशीर कारवाई संदर्भात पिं. चिं. पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री. डोईफोडे साहेब यांना निवेदन दिले त्यांनी देखील आपले सगळी बाजू ऐकून घेऊन कारवाईचे आश्वासन दिले.

या वेळी शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी, प्रदेश सचिव संजय परळीकर, प्रदेश ब्रह्मोद्योग उपाध्यक्ष राजन बुडुख, शहर उपाध्यक्ष अतुल इनामदार, ब्राह्मोद्योग अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, ब्रह्मोद्योग उपाध्यक्ष मकरंद कुलकर्णी, महिला शहराध्यक्ष सुषमा वैद्य, ब प्रभाग अध्यक्ष अभय कुलकर्णी, अ प्रभाग अध्यक्ष हेमंत मिश्रा, ब प्रभाग महिलाध्यक्ष संध्या कुलकर्णी, चैतन्य देशपांडे, भूषण जोशी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते