बौद्धिक विकासासाठी रोबोटिक सायन्स उपयुक्त : किकूची सान

0
255

पश्चिम विभागीय रोबो कप स्पर्धेत एस. बी. पाटील, सिटी प्राईड, ऑर्बीस स्कुलच्या संघाचा विजय

पिंपरी,दि. १९ (पीसीबी) – विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी रोबोटिक सायन्स उपयुक्त आहे. या माध्यमातून त्यांना अनेक प्रकारचे नवीन तंत्रज्ञान समजते आणि ते शिकण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे “रोबोटिक सायन्स” या विषयाकडे वेगळा दृष्टिकोन ठेवून बघितले पाहिजे असे प्रतिपादन जपानच्या एससीसीआयपीचे सीईओ किकूची सान यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे 15 ते 16 जानेवारी दरम्यान पश्चिम विभागीय रोबो कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या समारोपप्रसंगी सान बोलत होते.यावेळी आयएससीएल रोबोटिकचे सीईओ डेव्हिड प्रकाश, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, एस बी पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, प्राथमिक विभाग समन्वयिका शुभांगी कुलकर्णी, आयटी विभागाच्या प्रमुख रिचा अरोरा आदी उपस्थित होते.

डेव्हिड प्रकाश म्हणाले, रोबोटिक सायन्सचा अभ्यास करताना मुलांना विज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. विद्यार्थी हसत खेळत या विषयांचा अभ्यास करतात. त्याचा फायदा त्यांच्या उज्वल भविष्यासाठी होऊ शकतो असे डेव्हिड प्रकाश यांनी सांगितले. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचारक्षमता व कौशल्याधिष्ठित क्षमता निर्माण करण्यास रोबोटिक सायन्स उपयुक्त ठरेल.

रेस्क्यु लाईन, रेस्क्यु मेझ आणि ऑन स्टेज अशा तीन विभागात या स्पर्धा झाल्या. यामध्ये सतरा संघ सहभागी झाले. स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे –
1) रेस्क्यू लाइन – प्रथम क्रमांक – एस.बी. पी.पी.एस. : प्रथमेश देवशतवार, अथर्व पाटील, पुष्कर निकम, देवांशू तिवारी; सिटी प्राईड स्कूल : व्दितीय क्रमांक – शुभान माने, ओजस जैन, गितेश पाटील; तृतीय क्रमांक – सिटी प्राईड स्कूल निगडी : कौस्तुभ उथळे, आतिक्ष कुंकोलेंकर, अर्णव कारके;
2) रेस्क्यू मेझ – एस.बी पी.पी.एस. : प्रथम क्रमांक- सुयश कदम, स्वरित खरचे, स्वराज जाधव आणि हर्षवर्धन गोडसे; व्दितीय क्रमांक :एस. बी. पी. पी. एस. : सर्वेश गुरव, शीव जाधव, तेजल राक्षे, वेदांत माळी;
तृतीय क्रमांक – एस.बी पी.पी.एस. : दर्शील माळी, वेदांत निचीत, धवला पाटील, वेदांत घोटावदेकर;
3) ऑन स्टेज – प्रथम क्रमांक : ऑर्बीस स्कूल, केशवनगर : आकाशकुमार मौर्या, मल्हार कडाव; व्दितीय क्रमांक : एस.बी.पी.पी.एस – वैदेही वर्मा, आदिती नाईक, रोहिणी शिंपी, सौंदर्या पाटील;
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्‌माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. बिंदू सैनी तर स्वागत डॉ. गिरीश देसाई यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी कुलकर्णी, आभार रिचा अरोरा यांनी मानले.