बोलण्यात गुंतवून दागिने पळवले

0
1135

चऱ्होली, दि. १३ (पीसीबी) – दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्ध व्यक्ती आणि एका महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी चार वाजताच्या सुमारास देहूफाटा आणि रानवाडा हॉटेल समोर चऱ्होली येथे घडली.

चंद्रकांत राऊशेठ हालगे (वय 72, रा. मोशी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हालगे हे मोशी येथून आळंदी येथे देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी हालगे यांना इशारा करून थांबवले. त्यानंतर हालगे यांच्याशी गप्पा मारत असताना त्यांच्या बोटातील 5.850 ग्रॅम वजनाची 10 हजार रुपये किमतीची अंगठी हात चलाखीने काढून घेतली.

त्यांनतर हालगे यांच्यासोबत असलेल्या एका महिलेला देखील आरोपींनी बोलण्यात गुंतवले. त्यांचे सोन्याचे मंगळसूत्र काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आरोपींनी नेत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.