बोपखेल मध्ये टोळक्याकडून दुकानाची तोडफोड

0
505

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – किराणा दुकानदार सिगारेट विकत नसल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुकानाची तोडफोड केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे आठ वाजता बोपखेल येथे घडली.लक्ष्मण गेवरजी भाटी (वय 42, रा. बोपखेल) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश उर्फ बबलू मारुती दिसले, तेजस खरात, तुषार डोंगरे, बबलू गुलाब घुले, तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी किराणा दुकान आहे. त्या दुकानात आरोपी आले. त्यांनी फिर्यादीकडे सिगारेट मागितली. तेंव्हा फिर्यादीने ते सिगारेट विकत नसल्याचे आरोपींना सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. दुकानाच्या मालकीण आणि त्यांच्या घरातील लोकांना आरोपींनी ढकलून दगडफेक केली. त्यात एकजण जखमी झाले. रस्त्याने जाणा-या लोकांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपींकडे कोयते होते. पोलिसात तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.