बोपखेल,गणेशनगर येथील कु.गिरिजा गणेश शिंदे या मुलीच्या मृत्यू प्रकरणी वृंदावन सोसायटीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

0
165

बोपखेल, दि. २ ऑगस्ट (पीसीबी) – बोपखेल, गणेशनगर कॅालनी नं.2 येथे राहणाऱ्या कु.गिरीजा गणेश शिंदे या 3 वर्षीय मुलीचा अकाली अंत झाला, घरासमोरील रस्त्यावर खेळत असताना त्यांच्या घराशेजारी असणार्या वृंदावन सोसायटीचे गेट गिरीजाच्या अंगावर पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला, सदर घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी हि घटना आहे,याबाबत शिवसेनेच्या वतीने दिघी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री.विजय ढमाळ साहेब यांना निवेदन देऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली,याप्रसंगी पिंपरी-चिंचवड शहर संघटक सरिता साने,युवासेनेच्या युवती जिल्हाध्यक्ष प्रतिक्षा घुले,शाखाप्रमुख रामसिंग गिल,उपशाखाप्रमुख कृष्णा मोरे,युवानेते संदिप माने उपस्थित होते.

वृंदावन सोसायटीच्या मालकाला वारंवार सांगुन देखील व विनंती करून देखील सदर मालकाने या बाबतीत दुर्लक्ष केले व त्याची शिक्षा निरागस गिरीजा व तिच्या कुटुंबीयांना भोगावी लागली,गिरीजाच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.परमेश्वर त्यांना या दु:खातुन सावरण्याची शक्ती देवो.अशा भावना ताईंनी व्यक्त केल्या.