बोगस फेरीवाला सर्वेक्षण रद्द करा; शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी

0
355

पिंपरी दि .१९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक आज स्थायी समिती सभागृहांमध्ये पार पाडली. यावेळी मनपा सदस्याने चुकीच्या पद्धतीने चाललेल्या सर्वेक्षण बाबत आक्षेप घेतला बोगस व व्यवसाय न करणाऱ्या व्यावसायिकाची नावे रद्द करावी अशी सर्वांनी मागणी यावेळी सभागृहात लावून धरली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहा.आयुक्त प्रशांत जोशी, क्षत्रिय अधिकारी शितल वाकडे, सिताराम बहुरे, अण्णा बोदडे, केशवकुमार थोरात, राजेश आगळे, सुचिता पानसरे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, राजेंद्र वाकचौरे, कविता खराडे, संतोष जाधव, प्रल्हाद कांबळे,बी.जी. कांबळे, रमेश शिंदे, फरीद शेख, डॉ . सरोज अंबिके, बी के. कांबळे आदी सदस्य उपस्थित होते .

फेरीवाला सर्वेक्षणाचे काम ज्या एजन्सीला देण्यात आलेले आहे यावर प्रशासन आणि सर्व क्षत्रिय अधिकाऱ्याचे कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही आहे .वास्तविक क्षत्रिय अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांना सोबत घेऊन हे सर्वेक्षण करून त्यांचा शिक्का आणि पोहोच पावती वर देणे गरजेचे होते . बेकायदेशीर पणे बोगस टपऱ्या आणि हातगाड्या वर थांबून फोटो काढून हे सर्वेक्षण केले जात आहे. यामुळे खरे लाभार्थी बाजूला राहून संख्या वाढवण्यासाठी बोगस लोकांची जास्त भरती होत आहे. हे बोगस सर्वेक्षण रद्द करावे व खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा कायदेशीर लाभ द्यावा अशी मागणी काशिनाथ नखाते यांचेसह सदस्यांनी केली. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे सहिने पोहोच पावती द्यावी. ठेकेदार यांच्या कडे पावती असल्याने आर्थिक पिळवणूक होत आहे यावेळी जितेंद्र वाघ यांनी सर्वेक्षणामध्ये सर्वे झालेल्या लोकांची शहानिशा क्षत्रिय अधिकाऱ्यांनी करावी त्याचबरोबर ज्यांच्याबाबत आक्षेप आहे त्याचे रद्द करण्याबाबत प्रशासन भूमिका घेईल..