बॉयलर स्फोटात आठ जिवंत मजूरांचा क्षणात कोळसा

0
467

लखनऊ, दि. ४ (पीसीबी) – बॉयलरचा स्फोट झाल्याने केमिकल फॅक्टरीला आग लागली. या भीषण आगीत आठ मजूर जिवंत जळाले. कारखान्यात आणखी कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये शनिवारी (ता. ४) घडली. जोरात स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले होते.

हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज करीत बॉयलर फुटल्याने आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली.

अपघातावेळी कारखान्यात सुमारे २५ कामगार काम करीत होते. या अपघातात आठ मजूर जिवंत भाजले आहेत. अनेक कामगार दगावल्याचेही वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारखान्यात मदतकार्य सुरू आहे.