बावधन, दि. 14 (पीसीबी)
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बार मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 6,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री करण्यात आली.
सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय 21, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय 37, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बार मध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करत हॉटेल मालक सौम्यरंजन आणि मॅनेजर राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. कारवाई मध्ये सहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.