बैलांना मारहाण केल्याने वृद्धावर गुन्हा दाखल

0
2

शिरगाव, दि. २
ऊस कारखान्यावर बैलगाडी मधून ऊस घेऊन जात असताना बैलांना उसाने मारहाण केल्याबाबत वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हर्षवर्धन शिवकुमार चौधरी (वय ३५, रा. कोथरूड) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बारीकराव धोंडिबा गर्जे (वय ६५, रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्जे हे कासारसाई येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर बैलगाडी मधून ऊस वाहतूक करतात. ते ऊस वाहतूक करत असताना त्यांनी उसाने बैलांना मारले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना सुमारे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील आहे. व्हिडीओ पाहून चौधरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.