(पीसीबी) दि. २० : मराठीचा मुद्दा उचलून धरत एकत्र येणारे ठाकरे बंधू पहिल्याच इनिंगमध्ये फेल झाले आहेत. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा मोठा पराभव झाला असून एकही जागा जिंकता आलेली नाही. २१ पैकी एकाही जागेवर विजय नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे.
दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाकरेंनी ९ वर्षाची सत्ता गमावली
बेस्ट पतपेढीच्या एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक झाली होती. यामध्ये शशांकराव पॅनलचे सर्वाधिक १४ उमेदवार विजयी झाले. तर प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या ( महायुती ) सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील ९ वर्षांची सत्ता गमावली आहे.
बेस्ट पतपेढी निवडणूक अंतिम निकाल
शशांक राव पॅनल – १४
प्रसाद लाड आणि महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनल – ७
मनसे – शिवसेना – उत्कर्ष पॅनल – ०