बेवारस वाहनांचा होणार लिलाव

0
4

हिंजवडी, दि. 13 (पीसीबी)
हिंजवडी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या बेवारस वाहनांची लिलाव प्रकिया राबविण्यात येणार आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याकडील अनेक दुचाकी व चारचाकी बेवारस वाहने वर्षानुवर्षे धूळखात पडली आहे. या वाहनांच्या मालकांनी वाहनांची कागदपत्रे घेऊन ६० दिवसांच्‍या आत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन हिंजवडी पोलीस ठाण्‍याचे वरिष्ठ निरीक्षक कन्‍हैया थोरात यांनी केले आहे. चेसीस क्रमांक व इंजिन क्रमांक याची तपासणी करून मूळ मालकाला वाहन परत देण्यात येणार आहेत. या वाहनाचे मूळ वारस न आल्यास त्या वाहनाची लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. या वाहनांची यादी हिंजवडी पोलीस ठाणे येथील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.