बेवडा पिऊन किडन्या गेल्या, आमची लायकी काढतोय – मंत्री छगन भुजबळ

0
283

जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करण्याचे आवाहन

भिवंडी, दि. १८ (पीसीबी) – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष आणखी पेटणार आहे. भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगेंवर टीका केली आहे. तर, जरांगेंसमोर आणखी किती झुकणार असा थेट सवाल भुजबळांनी शिंदे सरकारला केला. त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशी चर्चा सुरू झाली. जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा कार्यक्रम येणा-या निवडणुकीत करा, असं भुजबळांनी म्हटलंय. भिवंडीमधल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी हे विधान केले आहे.

ओबीसी लढाई मी स्वतः साठी लढत नाही किंवा माझ्या घरच्या साठी लढत नाही. आमच्या समाजाला कुठे आरक्षण मिळायला लागले आहे. मराठा समाजाला विरोध नाही आमचा विरोधा झुंड शाहिला आहे. आमचे घर जाळले. जाळपोळ करणाऱ्याला विरोध आहे. मराठा समाजाला द्या आमचा विरोध नाही. आगोदरचे कुणबी आम्हला मान्य आहे. काही कुणबी म्हूणन फिरतात आणि खोटे दाखले दिले जातात. आगोदर आमच आरक्षण भरा नंतर दुसऱ्यांना द्या. खोटे कुणबी घेऊन आलेत. जरांगे आमची लायकी काढतात येवल्याचा एडपट बोलतात. आगोदर मरकट आहे. बेवडा पिऊन किडन्या गेल्या, आमची लायकी काढतोय आमची मुलं हुशार आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका केलेय.

आम्हाला गावबंदी आणि रोहित पवार यांचं स्वागत –
छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव घ्यायचे आणि आमच्या वर हल्ला करायचे. आम्ही सहा कोटी आहेत असे म्हणातत. कुठून आणले तुम्ही हे सहा कोटी. आम्ही ५४ टक्के आहोत. साडेसात कोटी ओबीसी आहे. दादागिरी एवढी वाढली आहे की गाव बंदी केली जाते. आम्हाला गावबंदी आणि रोहित पवार यांचं स्वागत. जालना मध्ये मिटिंग असेल तर सुट्टी दिली जाते. ही लोकशाही नाही गुंडगिरी आहे. आरक्षण मिळाला तर कार्यक्रम करू काय दादागिरी आहे.

तुम्ही आम्हला मारण्याची धमकी देता. पोलिसांना मारहाण करतो आम्हाला धमकी देतो. सर्वांनी एकत्र या पक्ष सोडा. महात्मा गांधी यांच्या उपोषण ठिकाणी इंग्रज सरकारचे अधिकारी जायचे. तसे आमचे मंत्री त्यांच्या पायाशी जातात पाया पडतात. हे थांबवायला पाहिजे. जें ओबीसी विरोधात बोलतात त्याचा येणाऱ्या इलेक्शन मध्ये दाखवून द्या. माझी वाट पाहू नका. साखळी उपोषण करा, जागो जागी मिटींगी घ्या, कँडल मार्च काढा असे आवाहन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना केले.