बेल्टने मारहाण, जखमांवर मिरची तर फेविक्विकने चिटकवले ओठ; तरुणीसोबत गंभीर अत्याचार

0
146
Woman hand sign for stop abusing violence, human trafficking, stop violence against women, Human is not a product. Stop women abuse, Human rights violations.

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने एका 23 वर्षीय मुलीला क्रूर वागणूक देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मध्य प्रदेशमधल्या गुना भागात घडली. आरोपीने लग्नासाठी प्रपोज केलं; पण तिने नकार दिल्यावर संतापलेल्या तरुणाने तिला बेल्ट व पाइपने मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याने फेव्हिक्विकने तिचे ओठ चिकटवले. या मुलीशी क्रूर वागणाऱ्या आरोपी अयान पठाणला अटक करण्यात आली आहे. तरुणी सध्या रुग्णालयात असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

गुना इथल्या नानाखेडी भागात ही 23 वर्षांची तरुणी तिच्या आईसोबत राहते, तिच्या वडिलांचं खूप वर्षांपूर्वी निधन झालंय. शेजारी राहणाऱ्या अयान पठाणला तिच्याशी लग्न करायचं आहे, असा आरोप तरुणीने केला आहे. त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तो तिने नाकारला. त्यामुळे अयान संतापला. त्याने तरुणीला कैद करून आपल्या घरात डांबून ठेवलं. त्यानंतर अनेक वेळा तिच्यावर जबरदस्ती केली.

घर नावावर करण्यासाठी दबाव
अयान तिला घराबाहेर पडू देत नव्हता, असं तरुणीने सांगितलं. तरुणीच्या आईने तिचं घर विकल्याचं अयानला समजल्यावर त्याला खूप राग आला आणि त्याने तरुणीवर घर त्याच्या नावाने करण्यासाठी दबाव टाकला. महिनाभर अयान या मुलीवर अत्याचार करत होता. त्यानंतर मंगळवारी रात्री त्याने मुलीला बेल्ट आणि पाण्याच्या पाइपने मारहाण केली.

जखमांवर टाकली मिरची पावडर
तिला मारहाण केल्यावर अयानने तिच्या जखमेवर मिरची पावडर टाकली. यामुळे तरुणी वेदनेने ओरडू लागली तेव्हा या निर्दय अयानने तिचे ओठ फेव्हिक्विकने चिकटवले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी कशीबशी मुलगी पोलीस ठाण्यात पोहोचली. त्या ठिकाणी तिने पोलिसांना आपली कहाणी सांगितलं. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अयानविरुद्ध गुन्हा दाखल केला व मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर अयानला अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आहेत. दोन्ही डोळ्यांना सूज आली असून, डॉक्टरांनी मोठ्या प्रयत्नांनी तिचे ओठ नीट केले.