बेटिंग प्रकरणी वाकड मध्ये कारवाई

0
209

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने काळेवाडी येथे बेटिंग प्रकरणी एक कारवाई केली. मंगळवारी (दि. १८) रात्री अकरा वाजता ही कारवाई करण्यात आली असून यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरीश दयालदास गुलानी (वय ४६, रा. काळेवाडी), एक महिला (वय ४९) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक देवा राऊत यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटिंग व्यवसायाला बंदी असताना आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी बेटिंग व्यवसाय चालवला. याबाबत माहिती मिळाली असता गुन्हे शाखेने छापा मारून कारवाई करत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये पोलिसांनी २५ हजार १५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.