बेटिंग प्रकरणी गुन्हे शाखेचे पिंपरीत कारवाई

0
182

पिंपरी, दि ४ (पीसीबी)- बेटिंगचा व्यवसाय चालवणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनने रविवारी (दि. 2) सायंकाळी पॉवर हाऊस रोड, पिंपरी येथे करण्यात आली.

लखू मोहनदास रखयानी (वय 38, रा. पॉवर हाउस रोड, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक देवा राउत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवर हाउस रोड, पिंपरी येथे एका सोसायटीमध्ये भारत सरकारने बंदी घातलेला बेटिंगचा व्यवसाय सुरु असून त्यातून काळ्या पैशांची आर्थिक उलाढाल होते. त्यातून शासनाची फसवणूक केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीतील एका सदनिकेत छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी एक लाख 80 हजार 500 रुपये किमतीचे बेटिंग लावण्याचे साहित्य जप्त केले. लखू रखयानी याच्या विरोधात फसवणूक, जुगार कायदा आणि टेलिग्राफ कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.