बेकायदेशीर रित्या दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा

0
211

आळंदी, दि. ८ (पीसीबी) – बेकायदेशीर रित्या दारु निर्मिती प्रकरणी महिलेवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.6) गुन्हे शाखा युनीट तीनच्या पथकाने कायाळी गाव येथे केली आहे.

आळंदी पोलीस ठाण्यात संबंधीत महिलेवर गुन्हा दाखल केला असून पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी चालवत होती. याप्रकरणी पोलिसांनी कारावाई करत तिच्याकडून 4 लाख रुपयांचे 8 हजार लिटरचे कच्चे रसायन जप्त केले आहे. आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.