बेकायदेशीर दारू वाहतूक

0
77

निगडी, दि. १४ (प्रतिनिधी)

बेकादेशिरपणे देशी दारुची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडीतील भक्तीशक्ती चौकाजवळ १३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिस शिपाई समीर लक्ष्मण रासकर यांनी या प्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जैनू मिरसाहेब शेख (वय ३५, रा. ओटास्किम, निगडी) आणि सुनिल विजयसिंग वाल्मिकी (वय ५१, रा. शास्त्रीनगर, पिंपरी ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ४३ हजार ७५० रपयांच्या देशी दारुच्या बाटल्या आणि बियरच्या बाटल्या बेकायदेशीरपणे वीनापरवाना विक्रीसाठी वाहनातून वाहतूक केल्या. शिवम कंट्री बार आणि शिवम विअर शॉपीच मालक शंकर जोधवाणी यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे काम केले. पोलिसांनी कारवाई करत एक सुमो गाडी आणि दारू असा ४ लाख ४३ हजार ७५० रुपयांचा ऐवज जप्त केला. निगडी पोलिस तपास करत आहेत.