बेकायदेशीर गॅस सिलेंडर वापरावर निर्बंध घालून कारवाई व्हावी – सचिन काळभोर

0
185

दि २६ मे (पीसीबी ) निगडी – मधुकर पवळे उड्डाण पूल खाली बी आर टी बस स्टॉप पाठीमागे हॉटेल उद्योजकांकडून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडर वापर सुरू असून त्या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच फोन करून माहिती देण्यात आली होती त्या संदर्भात अन्नधान्य वितरण अधिकारी पुणे व जिल्हाधिकारी कार्यालय ह्यांनी सचिन काळभोर यांच्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश लेखी पत्राद्वारे दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती गॅस सिलेंडर वापर करण्यासाठी व्यावसायिकांवर बंदी घातली असून रस्त्यावर किंवा उड्डाण पूल खाली घरगुती गॅस सिलेंडर वापर करता येणार नाही अशी बंदी घालण्यात आली असून सुद्धा निगडी अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय अंतरापासुन १०० मीटर आत मध्ये घरगुती गॅस सिलेंडर वापर सुरू आहे. ४०/४५ टपरीधारक व हातगाडी धारक उड्डाणपूलाखाली घरगुती गॅस सिलेंडर वापर करत असून त्या ठिकाणी घातपात होण्याची दाट शक्यता असून गॅस सिलेंडर स्फोट होऊन दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असल्याचे सचिन काळभोर यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात म्हंटले होते.