बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

0
48

पिंपरी,दि. 12 (पीसीबी) –
बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुल, तीन जिवंत काडतूसांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मंथन मोहन गायकवाड (वय २२ रा. मांजरी, हडपसर), चैतन्य आनंदा गुरव (रा. वाकी वरकुटे, ता. माण, जि. सातारा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना तपास पथकाच े पोलीस हवालदार अशोक डगळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एक संशियत खराळवाडी येथे येणार असून त्याच्याकडे बेकायदा पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा बसून संशयित मंथन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्याला अटक करून तपास करत असताना त्याने आणखी एक पिस्तूल साथीदार चैतन्य याला दिले असल्याचे सांगितले.

त्यानुसार पोलिसांनी पिंपरी परिसरातून चैतन्य याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. तसेच पुढील तपासात मंथन याने आणखी एक पिस्तूल त्याच्याकडे असणाऱ्या मोपेडमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आणखी एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. या कारवाई मध्ये पिंपरी पोलिसांनी तीन पिस्तूल, तीन काडतूस व दुचाकी यासह २ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.