बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करणाऱ्या नायजेरीयन व्यक्तीला अटक

0
64

सांगवी, दि. 21 (पीसीबी) : भारतामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका नायजेरीयन नागरिकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 20) पिंपळे गुरव येथे करण्यात आली.

चिडीएबेरे मोसेस ओगबोडो (सध्या रा. पिंपळे गुरव, पुणे) असे अटक केलेल्या नायजेरीयन व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल सुतार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओगबोडो हा मूळचा नायजेरीयन नागरिक आहे. तो व्हिसा काढून भारतात वास्तव्यास आला. दरम्यान त्याने व्हिसाची मुदत संपल्यानंतर ती वाढवून न घेता बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य केले. त्याने मतदान ओळखपत्र आणि पॅनकार्ड गैरमार्गे मिळवले. तसेच आधारकार्ड मिळवण्यासाठी त्याने आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे अर्ज केल्याचे निष्पन्न झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.