वाकड, दि. २८ (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. ही कारवाई गजानन नगर, रहाटणी येथे करण्यात आली.
गोरख प्रभू सातपुते (वय 29, रा. पवारनगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांना माहिती मिळाली की, गजानन नगर रहाटणी येथे एका व्यक्तीकडे बेकायदेशीर पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून गोरख सातपुते याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा 27 हजारांचा ऐवज जप्त केला.
गोरख सातपुते हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस स्टेशन तसेच पिंपरी चिंचवड मधील सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर यापूर्वी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, नीता गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, अनिरुद्ध सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, पोलीस अंमलदार वंदू गीरे, संदीप गवारी, स्वप्नील खेतले, आतिश जाधव, प्रमोद कदम, दीपक साबळे, अतिक शेख, विक्रांत चव्हाण, प्रशांत गिलबिले, रामचंद्र तळपे, विनायक घाडगे, अजय फल्ले, सौदागर लामतुरे, कौंतेय खराडे, भास्कर भारती, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे यांनी केली.