बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

0
67

भोसरी, दि. 22 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मोहननगर, भोसरी येथे करण्यात आली.

बालाजी रामदास गायकवाड (वय 42, रा. सद्गुरुनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप गंगावणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर भोसरी येथे धान्य गोदामा जवळ एक व्यक्ती बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रार निवारण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत बालाजी गायकवाड याच्यावर गुन्हा नोंदवला. त्याच्याकडून 34 हजार 835 रुपये किमतीची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.