बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
61

तळेगाव, दि. 25 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आंबळे गावात कारवाई केली. दोन हजार रुपये किमतीची दारू जप्त करत एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) सायंकाळी करण्यात आली.

भगसिंह मगसिंह गोयल (वय 32, रा. आंबळे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार भीमराव खिलारे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबळे गावात एकजण दारू विकत असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आंबळे गावातील महादेव भोजनालयाच्या पाठीमागील बाजूला छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी दोन हजार 180 रुपये किमतीच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.