बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0
288

माण, दि. १८ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) दुपारी मुळशी तालुक्यातील माण रोडवर सृष्टी मल्हार सोसायटी समोरील पत्र्याच्या खोलीमध्ये करण्यात आली.

पोलीस अंमलदार रवी पवार यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी केली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील माण रोड येथे सृष्टी मल्हार सोसायटीच्या समोरील पत्र्याच्या खोलीमध्ये एक महिला बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई करत महिलेविरोधात गुन्हा नोंदवला. महिलेच्या ताब्यातून 28 हजार रुपये किमतीची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.