बेकायदेशीरपणे दारूचे वाहतूक केल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
63

दापोडी, दि. १६ (पीसीबी)

बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केल्याप्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 15) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर कासारवाडी येथे करण्यात आली.

अशोक नाना भिसे (वय 21, रा. हडपसर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष बनकर यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर कासारवाडी रोड लगत पोलिसांनी एका पिकपला अडवले. त्याची तपासणी केली असता पिकप मध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी पिकप मधून पाच लाख 18 हजार 240 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. पिकप चालक बेकायदेशीरपणे विनापरवाना दारूची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले आले आहे. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.