बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक

0
54

आळंदी, दि. १८ (पीसीबी)

बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी (दि. 17) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बागवान वस्ती ते मरकळ रोड, मरकळ येथे करण्यात आली.

सनी पोपट कांबळे (वय 32, रा. लोहगाव, पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश कारोटे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी याच्याकडे दारू विक्रीचा तसेच वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना त्याने त्याच्या रिक्षा मधून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीची रिक्षा आणि 17 हजार 500 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.