बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक महिलेवर गुन्हा; एक लाख 36 हजारांचा दारूसाठा जप्त

0
103

विनापरवाना दारूची वाहतूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने एका रिक्षा चालक महिलेला पकडले. तिच्याकडून एक लाख 36 हजार 720 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) रात्री आठ वाजता शिंदे वस्ती, मारुंजी रोड येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार तुषार शेटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 38 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला तिच्या ताब्यातील प्रवासी रिक्षामधून बेकायदेशीरपणे दारूच्या बाटल्यांची वाहतूक करताना आढळून आली. तिच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख 36 हजार 720 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.