बेकायदेशीरपणे जागेत प्रवेश केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
75

शिरगाव, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – बेकायदेशीरपणे जागेत प्रवेश करून जागेतील तारेचे नुकसान केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 5) रात्री आठ वाजता उर्से गावातील साबळे फार्म येथे घडली.विष्णू वाल्हेकर (वय 59, रा. उर्से, ता. मावळ) आणि अन्य दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदेश कृष्णा पाशिलकर (वय 49, रा. उर्से, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साबळे फार्म येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या जागेत जाण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. असे असतानाही आरोपींनी बेकायदेशीरपणे जागेत प्रवेश केला. जागेतील कंपाउंडच्या तारा तोडून एक हजार रुपयांचे नुकसान केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.