बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग प्रकरणी तरुणास अटक

0
116

बेकायदेशीरपणे तसेच कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग केल्या प्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २०) सायंकाळी टॉवर लाईन, चिखली येथे करण्यात आली.

लहू दिनकर खाडे (वय २८, रा. टॉवरलाईन, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार अजित रूपनवर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लहू खाडे याने त्याच्या ताब्यातील घरगुती गॅस सिलेंडर मधून दुसऱ्या रिकाम्या सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग केला. गॅस रिफिलिंग करत असता ना त्याने कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली नाही. तसेच त्याच्याकडे याबाबत कोणताही परवाना नाही. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने कारवाई करत लहू खाडे याला अटक केली. त्याच्याकडून २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.