बेकायदा पत्रा शेड उभारल्याने शुभश्री वूडस हाऊसिंग सोसायटी अध्यक्षांवर कारवाई

0
18

पिंपरी, दि. २० – सोसायटी आवारात बेकायदा पत्रा शेड उभारल्याने पिंपळे सौदागर येथील शुभश्री वूडस हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष प्रदीप सतपती अणि खजिनदार रितेश हरीश बोरीकर यांना सहकार उपनिबंधक पुणे शहर (3) यांनी पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे.
संचालक मंडळाच्या काही सदस्यांवर बरखास्तीची कारवाई केली आहे.
सोसायटीचे सदस्य चंद्रकांत उमाटे यांनी, बेकायदेशीर शेड काढण्याबाबत, तसेच सोसायटी च्या कार्यालयीन कामकाजाचे कागदपत्र देण्याबाबत, दोन-अडीच वर्षांपासून सहकार उपनिबंधक कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला होता. सोसायटीच्या कार्यकारिणी समितीने सोसायटी च्या आवारात, महानगरपालिकेची परवानगीशिवाय, बेकायदेशीररित्या मोठे शेड बांधले होते. श्री. उमाटे यांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि माहिती दडविण्यात आली. अखेर त्यांनी महापालिका प्रशासन तसेच सहकार उपनिबंधक यांच्याकडे रितसर तक्रार केली होती.
उपनिबंधक श्री. नागनाथ कंजेरी यांनी वारंवार निदेश दिल्यानंतर देखील, सोसायटी च्या संचालक मंडळाने बेकायदेशीरपणे बांधलेले पत्र्याचे शेड काढले नाही. म्हणुन, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 154 बी 23 नुसार कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या वतीने, ॲड. शिवजीत तावरे यांनी बाजू मांडली