‘बॅक टू स्कूल’ मराठी चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला

0
46
 दि.0९ (पीसीबी) - शाळा  या शब्दाभोवती प्रत्येकाच्या आठवणींचे छोटेसे विश्व उभे राहते. प्रत्येकाला शाळेच्या आठवणी फार प्रिय असतात. पुन्हा एकदा या आठवणींना उजाळा देणारा एक नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘बॅक टू स्कूल’ असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ आता सज्ज झाला आहे. गुरुवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटक व गोवा या राज्यात तसेच अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण ( विश्वासराव ), सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी कलाकार तसेच विराज जाधव, प्रसाद कुलकर्णी, आयुष जगताप,तुषार गायकवाड,यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड ,जीवन भंडारी,आर्या घारे, विशाखा अडसूळ,हिमांगी टपळे, प्रगती पिंगळे, शर्वरी साठे,तन्वी गायकवाड,साक्षी शेळके,मौली बिसेन, नंदिनी पाटोळे आर्या कुटे, सार्थक उढाणे व समर्थ जाधव या बाल कलाकारांची प्रमुख भूमिका असून चित्रपटात सोनाली गव्हाणे, मनोज चौधरी, संदीप साकोरे, सुरेश डोळस, मीना गायकवाड,दत्ता उबाळे,सुवर्णा चोथे, सागर जाधव,एकता जाधव,वीणा वैद्य, अर्चना सातव, मिलिंद संगावार यांनीही महत्वाच्या भूमिका केल्या असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले आहे.

    शाळा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. तो वर्ग, घंटानाद, शिक्षक शाळेबाबतच्या या आणि अशा अनेक गोष्टी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आठवणीत असतात. हृदयाच्या अशा जवळच्या विषयावरील चित्रपटाची निर्मिती शुभांगी सतीश फुगे आणि सतिश महादु फुगे यांनी केली आहे. तर सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे, सुरेखा पवार यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे असून छायाचित्रणाची धुरा श्रीनिवास गायकवाड यांनी सांभाळली आहे. 

     पुन्हा एकदा शाळेची सफर घडवण्यासाठी गुरुवार , दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओ, मुंबई यांनी घेतली आहे.