बुलेटच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
271

मोशी, दि. २१ (पीसीबी) – बुलेटच्या धडकेत हातगाडी चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 19) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास संतनगर मोशी येथे घडली.

राजेभाऊ बापूराव शिंदे (वय 45, रा. आदर्शनगर, मोशी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काशिनाथ बापूराव शिंदे (वय 49) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर किसन कांबळे (वय 32, रा. संत नगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ राजेभाऊ शिंदे हे हातगाडा लाऊन त्यावर कुरकुरे, बॉबी विक्रीचा व्यवसाय करतात. ते बुधवारी सायंकाळी सव्वासात वाजता संतनगर मोशी येथील महाराजा चौकात हातगाडा लाऊन थांबले असताना एमएच 12/एनझेड 7807 या क्रमांकाच्या बुलेटवरून आरोपी आला. त्याने भरधाव वेगात बुलेट चालवून राजेभाऊ यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.