बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने पिंपरीत निदर्शने

0
130

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – सध्या दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टातील वकिलांच्या वतीने ईव्हीएम विरोधी आंदोलन सुरू आहे. ईव्हीएम च्या बाबतीत सर्वच नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड शंका आहेत. सुप्रीम कोर्ट च्या वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि आपणही ईव्हीएम विरोधी भूमिका घेत आहोत, हे व्यक्त करण्यासाठी बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक ११ वाजता पिंपरी येथील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते इंडिया आघाडी पिंपरी चिंचवड शहरचे निमंत्रक मानव कांबळे यांनी सांगितले. आघाडीच्या वतीने ईव्हीएम हटाओ – देश बचाओ आणि ईव्हीएम हटाओ – संविधान बचाओ असा नारा देण्यात आला आहे.